विश्वरुपदर्शनयोग
अर्जुनाला परमेश्वराचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा म्हणून भगवान त्याला अंतर्प्रेरणेने पाहण्याची दृष्टी प्रदान करतात. भगवान त्याच्यासाठी आपले विश्वरुप प्रकट करतात ज्यात अर्जुनाला त्याच क्षणी जे जे अस्तित्वात आहे ते सर्व काही - भूत, वर्त्तमान व भविष्य - विस्तारलेले, सम्पूर्ण समावेशक तत्वचा एक अविभाज्य भाग असल्याप्रमाणे दिसले. तय दिव्य पुरुषाची भव्यता व प्रखर तेज अर्जुनाच्या आकलनशक्तिच्या पलीकडचे होते. भगवान त्याच्यासमोर उघड करतात की सर्व जीव अगतिकपणे भगवंतांशी एकरुप झालेल्या काळतत्वाकडे त्या पुरुषाकडे ओढले जात आहेत व "त्या"त विरघळून जात आहेत.
सर्व जीवांची इच्छा समाहित असलेली अशी केवळ दैवी इच्छाच आहे. हे सर्व जीव केवळ, "त्याची"च इच्छा पूर्ण करणारी व त्याच्या योजना यशस्वी करणारी, साधने आहेत. युद्धभूमीवर उभ्या असलेल्या दोन्ही विरुद्ध पक्षांच्या रांगा, त्यांचे योद्धे, प्रमुख, सर्वजण भगवंतांच्या इच्छेने आधीच नष्ट झालेले आहेत हे अर्जुनाने पाहिले. आपण स्वतःही भगवंतांचे केवळ एक साधन आहोत हे लक्षात घेऊन तो निर्भय होऊन भगवंतास भक्तिभावाने शरण गेला.
G1012VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|