भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय केवळ वीस श्लोकांचा आहे. तो सर्वात लहान आहे, परंतु तरीही, त्यातील श्लोक वेदान्ताच्या दृष्टीचा सम्पूर्ण सारांश स्पष्ट करतात.
मुळे वर व फांद्या खाली आशा उलट्या वृक्षाच्या रुपकाचा उपयोग करुन भगवान श्रीकृष्ण जगाच्या खऱ्या स्वरुपाचे वर्णन करण्यास प्रारंभ करतात. अशा प्रकारे, पाया घातल्यानंतर भगवान पुढे व्यष्टि आत्म्याचे - जीवाचे - स्वरुप दाखवून देतात. विचारांचे हेच सूत्र पुढे चालू ठेवीत ईश्वराचे स्वरुप दाखवून देतात. अशा प्रकारे प्रत्येक घटकाची उकल केल्यानंतर भगवान ह्या तिघांमध्ये असलेला संबंध प्रस्थापित करतात व सर्वांची सांगड घालतात.
अशा प्रकारे पंधरावा अध्याय पद्धतशीरपणे काही सोप्या वाटणाऱ्या पण महत्वाच्या प्रश्नांची तत्वज्ञानाच्या साधकास आवश्यक असणारी स्पष्टिकरणे देतो.
G1016VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|