त्रिविध श्रद्धा
श्रद्धेचे सामर्थ्य - सतराव्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या मनात असा विचार येतो की ज्यांना आपल्या धर्मग्रंथांबद्दल विशेष माहिती नाही ते त्याची माहिती न घेता स्वतःच्या विचारसरणीनुसार (श्रद्धा) कार्य करतात ते योग्य की अयोग्य? यावर भगवान विस्तारपूर्वक उत्तर देतात की एखाद्याने जोपासलेली श्रद्धा (विचारसरणी) त्याच्या मानसिक दृष्टिकोनावरुन निश्चित करता येते. ही श्रद्धा माणसाच्या इंद्रियजन्य भोगात रममाण होणे (आहार), समर्पणाच्या भावनेने कर्म करणे (यज्ञ), स्वतःस विषयोपभोगापासून दूर ठेवणे (तप) आणि दान करणे यावरुन ती कशी आहे ते पाहता येते.
प्रत्येकाच्या स्वभावधर्मानुसार श्रद्धा ही तीन प्रकारची असते हे भगवान विशद करतात - १) संतुलित आनंद (सत्व), २) महत्वाकांक्षी व क्रिया करण्यास अतिशय उत्सुक (रजस), ३) असंतुलित, संभ्रमित, मंद, निष्क्रिय, उदास अशी स्तिथि (तमस).
आपण सात्विक स्वभावधर्म आपल्यात बाणविण्यासाठी कसा प्रयत्न करावा यासंबंधी यानंतरचे विवेचन करण्यात आले आहे.
G1018VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|